जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब मधील ग्राफिक डिझाईनच्या दीर्घकालीन प्रॅक्टिकल अनुभवातून ‘ग्राफिक  आर्ट ट्रेनिंग इन्स्टिटयूट अँड रिसर्च सेंटर, पुणे’ या संस्थेची स्थापना झाली. चार भिंतीच्या वर्गात समोरासमोर गेली अनेक वर्षे मर्यादित विद्यार्थ्यांसाठी शिकविले जाणारे आणि हमखास करिअर घडविणारे ग्राफिक डिझाईनचे कोर्सेस आता या ऑटोनॉमस संस्थेमार्फत मराठीतून अद्ययावत ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे उपलब्ध करून देत आहोत.  

आधुनिक प्रॅक्टिकल शिक्षण पद्धती: (Student Learning Outcome)

आधुनिक शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ई.स. 2000 ते 2010 पर्यंत शिक्षण तज्ज्ञांच्या अधिवेशनांमध्ये नुसती चर्चा सुरु होती, स्थानिक पातळीवर का होईना पण त्या वेळी आम्ही या स्टुडन्ट लर्निंग आऊटकम संकल्पनेचा वापर करायला सुरुवात केली होती. योगायोग असेल कदाचित पण 17 वर्षांपूर्वीपासून आम्ही ज्या पद्धतीने शिकवत आहे, त्या सदृश्य शिक्षण पद्धतीचा शिक्षण तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला. आणि त्या संकल्पनेला स्टुडन्ट लर्निंग आऊटकम असे नाव दिले. आम्ही स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात आणि मराठीत शिकवत होतो, पण आम्ही जे शिकवत होतो ते योग्यच होते. आणि हमखास विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारे होते. हे सिद्ध झाले आहे. आणि हाच सिद्ध झालेला अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती आम्ही आता ग्राफिक आर्ट ह्या ऑटोनॉमस संस्थेमार्फत ऑनलाईन ग्रुप कोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध केल्याने तुम्ही तुमच्या नजिकच्या आमच्या  शाखेत, शाळेत, संस्थेत, कॉलेजमध्ये किंबहुना घरीसुद्धा पूर्ण करू शकता. ग्राफिक डिझाईनच्या या व्यवसायाभिमुख कोर्सेसचा उपयोग विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी नक्कीच होईल. ग्राफिक डिझाईनमधील करिअरविषयी अधिक सविस्तर माहिती लवकरच आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून पब्लिश करीत आहोत. 

संस्थेची उद्दिष्टे : Objectives :

1. ग्राफिक डिझाईन / ग्राफिक आर्ट, जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब आणि मोबाईल ऍप्स डिझाईन, ऍनिमेशन, फिल्म मेकिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल नेटवर्किंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स, आदी कला आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध ऑनलाईन व्यावसायिक कोर्सेसची निर्मिती करणे, आणि विद्यार्थ्यांना केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे.  

2. ऍडव्हान्स लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम विकसित करणे, व त्याद्वारे सहज समजेल अशा साध्या, सोप्या पद्धतीने प्रथम  मराठी, कन्नड, तेलगू आदी स्थानिक भाषेतून त्यानंतर राष्ट्रीय भाषा हिंदीतून आणि शेवटी हेच कोर्सेस  इंग्रजी भाषेत रूपांतरित करून जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार करणे. 

3. जिल्हा आणि तालुका स्तरावर ग्राफिक आर्ट कोर्सेसच्या शाखा स्थापन करणे. त्यामुळे  तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. स्थानिक पातळीवर असे ऑनलाईन  शिक्षण मिळाल्यामुळे मोठ्या शहरात येऊन शिक्षण घेण्याचा त्यांचा खर्च वाचेल.  

4. ग्राफिक आर्टचे व्यावसायिक महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यासाठी व्याख्याने, सेमिनार्स, आणि संबंधित विषयांची वर्कशॉप्स आयोजित करणे. हे कार्यक्रम ऑनलाईन आणि प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी जाऊन राबवणे.  

5. ग्राफिक आर्ट ही प्रिंट / पब्लिकेशन्सशी संबंधित असल्याने शैक्षणिक मासिक / साप्ताहिकाची निर्मिती करून त्यातून विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मितीचा स्रोत तयार करणे.  

6. ग्राफिक आर्ट ही इंटरनेटशीही संबंधित आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय आणि रोजगार निर्माण होतील अशी वेब आणि मोबाईल ऍप्सची निर्मिती करणे.  

7. बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल करून अभ्यासक्रम दरवर्षी अपडेट करणे. 

8. ग्राफिक डिझाईनच्या बेसिक सर्टिफिकेट कोर्सनंतर ग्राफिक डिझाईन स्किल्स इन ऍडव्हर्टायझिंग अँड प्रिंटिंग आणि ग्राफिक डिझाईन स्किल्स इन वेब अँड ऑनलाईन मार्केटिंग. असे प्रत्येकी एक एक वर्षाचे दोन पूर्ण वेळ डिप्लोमा कोर्सेस विकसित करणे. त्यामुळे विद्यार्थ्याला सखोल व्यावसायिक ज्ञान मिळेल. आणि  विद्यार्थी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करेल.

Scroll to Top