प्रॅक्टिकल अभ्यासक्रमावर आधारित जगमान्य झालेल्या विद्यार्थी केंद्रित ‘स्टुडन्ट लर्निंग आऊटकम्स’ संकल्पनेनुसार, शिकण्याची आणि शिकविण्याची जी पद्धत असायला हवी अगदी तीच पद्धत आम्ही आजवर वापरत आलो आहोत. विद्यार्थी वर्षात कमवायला शिकण्यापाठीमागील उघड गुपित हेच आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये हमखास करिअर घडविणारे हेच शिक्षण ऑनलाईन कसे देता येईल हे एक मोठे चॅलेंज होते, पण आम्ही ते स्विकारले आणि जगभरातील विविध ऑनलाईन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या निश्चित फायद्याची तरीही साधी आणि सोपी पद्धत शोधून काढली. आज आणि भविष्यात नेहमीच आता ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही, हे आम्ही खूप वर्षांपूर्वीच समजून होतो. कोरोनाच्या निमित्ताने जरी ऑनलाईन शिक्षणाची गरज निर्माण झाली असली, तरीसुद्धा येणाऱ्या काळात ऑनलाईन शिक्षणाला महत्व येणारच होते, हे आम्ही जाणून होतो. म्हणूनच ऑनलाईन शिक्षणाची जास्तीत जास्त युझर फ्रेंडली पद्धत शोधण्याचा आम्ही पाठपुरावा केला, आणि सुदैवाने त्याला यश आले. ग्राफिक डिझाईन हा माझा विषय असला तरी, कोणताही अभ्यासक्रम जर ह्या पद्धतीने गांभीर्याने तयार करून ऑनलाईन शिकविला, तर विद्यार्थ्यांचे करिअर घडलेच पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. 

    कोणताही एखादा विषय सोपा कि अवघड हे सापेक्ष असते. शिकविणाऱ्याचे संबंधित विषयाचे ज्ञान आणि शिकविण्याचे कौशल्य हे त्या विषयाला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अवघड किंवा सोपा विषय बनवत असते. विद्यार्थ्याला वर्गात समोर शिकविणे आणि ऑनलाईन शिकविणे यामध्ये फक्त माध्यमाचा फरक आहे. पण जे वर्गात शिकवतो तेच फक्त ऑनलाईन शिकवायचं असतं. दोन्ही पद्धतींमध्ये विद्यार्थ्याला समजले किती, आणि त्याचा त्याला व्यावहारिक उपयोग होतो का हेच महत्वाचे आहे. मुळात शिक्षण पद्धतीच चुकीची असेल तर हाताला धरून जरी शिकविले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. हे कटू सत्य आहे. पुस्तके वाचून वर्षभर अभ्यास आणि तीन तासांची परीक्षा यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कधीच होऊ शकणार नाही. वर्षाच्या शेवटी परीक्षेला बसायचे म्हणून घाईगडबडीत प्रोजेक्ट सबमिशन हा तर निव्वळ गाढवपणा आहे. कसं घडणार करिअर सांगा. नियमित प्रॅक्टिकल अभ्यास हाच एक साधा, सोपा आणि हमखास करिअर घडविण्यासाठी रामबाण उपाय आहे. पण लक्षात कोण घेतो? असो,

     विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल पण वर्षानुवर्षे चार भिंतीच्या वर्गामध्ये शिकवून आम्ही विद्यार्थ्यांचे करिअर घडविले आहेच, पण गेल्या काही वर्षांपासून हेच शिक्षण ऑनलाईन देण्याच्या प्रयत्नाने एक सदृढ ऑनलाईन शिक्षण पद्धती तयार झाली आहे. आज आमची तीच ऑनलाईन शिक्षण पद्धती सांगण्याचा  माझा प्रयत्न आहे. 

     वर मी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्याचा नियमित प्रॅक्टिकल अभ्यास झाला पाहिजे. माझा विषय ग्राफिक डिझाईन आहे, हा विषय तर पूर्णपणे प्रॅक्टिकलवर अवलंबून आहे. शिवाय यामध्ये विचार करणे, चिंतन करणे, तर्क करणे, कल्पना सुचणे, सौंदर्य दृष्टी अशा अनेक गोष्टीं अत्यंत महत्वाच्या असतात. नुसती सॉफ्टवेअर्स शिकून कोणी आर्टिस्ट / ग्राफिक डिझाईनर होऊ शकत नाही. म्हणूनच ग्राफिक डिझाईन ऑनलाईन शिकवायचं आणि दररोज थोडा थोडा प्रॅक्टिकल अभ्यास करून जे वर्क होईल त्याची असाईनमेंट त्या त्या दिवशी अपलोड करायची, ही आमची पहिली अट असते. ती असाईनमेंट तपासून त्याबद्दलचा शेरा दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक दिवसाच्या प्रॅक्टिकल अभ्यासाची नोंद राहते. अभ्यास केल्याचं विद्यार्थ्याला आणि पर्यायाने आम्हालाही त्याचं समाधान मिळतं. वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याचा मूल्यमापनासाठी परीक्षेची गरजच काय? परीक्षा केवळ एक औपचारिकता शिल्लक राहते. परीक्षेच्या निकालावर आमच्या विद्यार्थ्यांचे करिअर मुळीच अवलंबून नसते, तर ते त्याच्या नियमित प्रॅक्टिकल अभ्यासाने आपोआप घडते. हे आमचे साधे सोपे सूत्र आहे. 

ऑनलाईन शिक्षण पद्धती :

     ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे ह्यावर खूप चर्चा आणि प्रयोग सुरु आहेत. रिअल टाईम ऑनलाईन शिक्षण प्रकारात Zoom, Google Meet, MS Teams सारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. क्लासच्या वेळेत सर्वच विद्यार्थी हजर असले तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे अनेक प्रॉब्लेम्स येतात. सर आवाज ऐकू येत नाही, सर दिसत नाही. अशा तक्रारी असतात. किंवा लॉगिन करून विद्यार्थी इत्तर कामे करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांवर कंट्रोल राहणार कसा? ऑनलाईन परीक्षेचा पेपर तर 100  टक्के कॉपी करून सोडवतात. विषय समजलेला असो / नसो, काहीही करून पास व्हायचे आणि  डिग्री पूर्ण करायची हाच काय तो उद्देश असतो. कसे होणार करिअर सांगा? प्रचलित थेअरीबाज शिक्षण पद्धतीची हीच शोकांतिका आहे. 

     ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या दुसऱ्या प्रकारात रेकॉर्डेड कोर्सेस / लेसन्स असतात. विद्यार्थ्याने केंव्हाही त्यांच्या वेळेत त्यांच्या सवडीनुसार तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. आणि शेवटी ऑनलाईन परीक्षा असते. सर्टिफिकेट मिळते. पण ह्यामध्ये फक्त लेक्चर व्हिडीओ  पाहून शिक्षण घेणे म्हणजे तोही पारंपरिक नुसत्या थेअरीचाच अभ्यास म्हणावा लागेल. ज्याचा प्रत्यक्षात विद्यार्थ्याला काही उपयोग होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकनाचा जो गहन प्रश्न निर्माण झाला आहे तो यामुळेच. नुसत्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणाऱ्या प्रचलित शिक्षण पद्धतीमुळे दुसरे काय होणार?  विद्यार्थ्यांचे करिअर ही खूप दूरची गोष्ट आहे. 

आमची दुहेरी ऑनलाईन शिक्षण पद्धती कशी आहे?

     रियल टाईम लाईव्ह आणि रेकॉर्डेड प्रोग्रॅम ही दोन्ही ऑनलाईन शिक्षणाची माध्यमे आहेत. साध्य नाही. असे असले तरी ते वापरायला साधे, सोपेच असायला हवे. हा आमचा आग्रह असतो. तुमची शिकविण्याची पद्धत विद्यार्थ्याला त्याच्या साध्यापर्यंत पोहोचविते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही वरील दोन्ही पद्धती वापरतो. पण प्रॅक्टिकल अभ्यास आणि दररोज असाईनमेंट सबमिशन ह्या दोन गोष्टी आम्ही प्रामुख्याने त्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. करिअर विषयक व्यावहारिक गरज ओळखूनच प्रॅक्टिकल डेली वर्क असाईनमेंट्स बरोबरच अभ्यासाचे गांभीर्य, कामाचा दर्जा, निष्ठा, निवडलेल्या करिअर क्षेत्राबद्दल आत्मीयता, आत्मविश्वास आणि वैचारिक परिपक्वता निर्माण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.

     आमच्या ऑनलाईन क्लासरूममध्ये एका बाजूला रियल टाईम लाईव्ह प्रॅक्टिकल लेसन शिकविला जातो. आणि दुसऱ्या बाजूला त्याच लेसनचे मुद्देसूद स्पष्टीकरण करून स्टेप बाय प्रॅक्टिकल ट्युटोरिअल असते. साधारण एक तास प्रॅक्टिकल लेसन झाल्यानंतर त्याच प्रॅक्टिकल लेसनचा रेकॉर्डेड लेसन पाहून विद्यार्थी सराव करतो. हाच प्रॅक्टिकल लेसन विद्यार्थी घरी गेल्यावरही लॉगिन होऊन शिकू शकतो. ह्या लेसनवर आधारित होमवर्क साठी काही  असाईनमेंट्स दिलेल्या असतात. त्यापैकी जास्तीत जास्त असाईन्मेंट्स पूर्ण करून त्या पुढचा लेसन सुरु करण्यापूर्वी अपलोड करायच्या असतात. प्रत्येक असाईनमेंटला स्वतंत्र गुण असतात. होमवर्क असाईनमेंट व्यतिरिक्त सरावासाठी विद्यार्थी स्वतःच्या कल्पनेने काही असाईनमेंट्स बनवू शकतो. त्याचे त्याला वेगळे गुण मिळतात. परीक्षेशिवाय अशा नियमित असाईनमेंट्सच्या एकूण गुणांची बेरीज मिळून त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होते. ज्या त्या लेसनच्या असाईनमेंट्स त्या त्या दिवशीच अपलोड करायच्या असल्याने विद्यार्थ्याला नियमित अभ्यासाची सवय लागते. शिवाय त्याचा एकूण स्कोअरही वाढतो. नियमित प्रॅक्टिकल वर्क, अधिक स्कोअर, अधिक गुणवत्ता हे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे आमचे साधे सोपे समीकरण आहे.  

ऑनलाईन कोर्स मटेरियल :

     पी.सी. किंवा लॅपटॉप ( किमान Core i5, 1TB Hard Disk, 8GB Ram, 2gb Graphic Card, Headphone with Mic, Web camera etc. ), एक एक्स्ट्रा मॉनिएटर जोडलेला असावा. म्हणजे एका मॉनिएटरवर क्लासरूम आणि दुसऱ्या मॉनिएटरवर तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करता येईल. शिकणं अधिक सोपं होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, सॉफ्टवेअर्समध्ये कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप. व्हर्जन कोणतेही चालेल. शिकविण्यासाठी CorelDRAW X6 आणि Photoshop CS6 वापरले आहे.  सॉफ्टवेअर्सच्या व्हर्जनवर काही अवलंबून नसते. व्हर्जन कितीही जुने किंवा कितीही ऍडव्हान्स असले तरी त्यामधील बेसिक गोष्टी कधीच बदलत नाहीत. ग्राफिक डिझाईनसाठी जे बेसिक शिकायचं असतं ते प्रत्येक व्हर्जनमध्ये असतंच. आणि एकदा ग्राफिक डिझाईनच्या बेसिक संकल्पना समजल्या कि त्यासाठी लागणारं कोणतेही सॉफ्टवेअर तुम्ही आरामात शिकू शकता. तेंव्हा सॉफ्टवेअर्सविषयी जुन्या, नव्या व्हर्जनची भीती किंवा गैरसमज मनातून काढून टाका. मित्रानो, ग्राफिक डिझाईन खूप सोपं आहे. एवढंच लक्षात ठेवा. कोर्स मटेरिअलमध्ये स्केचिंगसाठी एक कोरे स्केच पॅड, 4B पेन्सिल आणि लिहिण्यासाठी एक नोटबुक किंवा डेली डायरी जवळ असुद्या. कारण स्केचिंग आणि रायटिंग ग्राफिक डिझाईनसाठी खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी तुमचा स्वतःचा एक ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर पाहिजे. जो पुढे कधी बदलू नका. ऍडमिशन फायनल झाल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड सबमिट करायचे आहे. बस्स, 

साधी आणि सोपी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :

1. https://graphicart.in ह्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा. 

2. रजिस्टर फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला ई-मेल व्हेरिफिकेशनसाठी एक ई-मेल येईल. त्या ई-मेल मधील ई-मेल व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. 

3. आता तुम्ही लॉगिन व्हा. मेनूमध्ये शेवटी Welcome च्या पुढे तुमचे नाव दिसेल. 

4. क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट कोर्स थंबनेलमधील ‘Go to Course Page’ बटनवर क्लिक करा. कोर्स पेज ओपन होईल. 

5. आता TAKE THIS COURSE बटनवर क्लिक करा. 

6. Payment Options ड्रॉप डाऊन मधील तुम्हाला हवा असलेला पेमेंट ऑप्शन निवडा. 

7. Enroll Now बटनवर क्लिक करा. Cart पेज ओपन होईल. 

8. Cart पेजवरील Proceed to checkout बटनवर क्लिक करा. Checkout पेज ओपन होईल. 

9. Checkout फॉर्म पूर्ण भरून Place Order बटनवर क्लिक करा आणि पेमेंट करा. 

( टीप  : कोर्स फीचे पेमेंट ऑनलाईन करायचे नसेल तर Checkout फॉर्ममधील Direct bank transfer ऑप्शन निवडून Place Order बटनवर क्लिक करा आणि प्रवेश घ्या. आमच्या  बँकेत कॅश किंवा चेक डिपॉजिट करून किंवा Google Pay करून त्याची डिटेल्स ई-मेल किंवा Whatsapp करा. पेमेंट मिळाल्याची खात्री करून आम्ही तुमचे ऍडमिशन फायनल करू.)

10. ऍडमिशन फायनल झाल्यानंतर इन्व्हाईस आणि पेमेंट रिसिटसह तुम्हाला ई-मेल येईल. 

कशी असेल ऑनलाईन क्लासरूम ?

सोमवार ते शुक्रवार रोज सायं. 6 ते 8 रिअल टाईम लाईव्ह टिचिंगशिवाय स्वतंत्र ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही वापरली आहे. ज्यामध्ये झालेला व्हिडीओ लेसन 24 तास कधीही उपलब्ध असतो. विद्यार्थी केंव्हाही त्याच्या सवडीनुसार तो व्हिडीओ लेसन पाहून सराव करू शकतो. आणि त्याखाली दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करून तिथेच त्या असाईनमेंट्स त्याला अपलोड करायच्या असतात. दररोज नियमित असाईनमेंट्स अपलोड करण्याचे बंधन आहे. असाईनमेंट्स चेक करून आम्ही त्याचे अप्रूव्हल देतो. आणि नंतरच  विद्यार्थ्याला दुसरा लेसन ओपन करता येतो. असाईनमेंट सबमिट केल्या नसतील तर तो दुसऱ्या दिवशी रियल टाईम कलासरूममध्ये बसू शकतो, पण त्या दिवशीचा 24 तास उपलब्ध असलेला व्हिडीओ लेसन तो ओपन करू शकत नाही. म्हणूनच ज्या त्या दिवशी असाईनमेंट्स सबमिट करणे सक्तीचे केले आहे. 

विद्यार्थ्यांचे शंका समाधान :

एखादा टॉपिक शिकविल्यानंतर किंवा संबंधित लेसनखालील असाईनमेंट्स करत असताना विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी आमचे स्वतंत्र सपोर्ट सेंटर आहे. क्लासरूममध्ये लेसन शिकवून झाल्यानंतर पुढच्या प्रॅक्टिकलच्या एक तासात विद्यार्थी डायरेक्ट शंका विचारू शकतो. किंवा प्रत्येक लेसन झाल्यानंतर त्याला जो ई-मेल येतो, त्याला रिप्लाय देऊन प्रश्न विचारू शकतो. सपोर्ट सेंटरमध्ये प्रश्न अपलोड करू शकतो. व्हाट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करूनही तो शंका विचारू शकतो. कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्याच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले जाते. कोर्स कालावधीतच नव्हे तर तर पुढे करिअरमध्ये लाईफ टाईम आमचा त्याला सपोर्ट राहतो. 

परीक्षा आणि सर्टिफिकेट :

आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये नियमित प्रॅक्टिकल अभ्यास आणि दररोज असाईनमेंट्स सबमिशन हीच खरी परीक्षा असते. वर्षाच्या शेवटी परीक्षा ही केवळ एक औपचारिकता शिल्लक राहते. तरीपण ह्या ऑनलाईन परीक्षेचा पेपर कॉपी करून सोडविण्याइतका सोपा मुळीच नसतो. शेवटी परीक्षा झाल्यावर संस्थेचे सर्टिफिकेट मिळते, पण खरे पाहता विद्यार्थ्याचा वर्षभरातील परफॉर्मन्स पाहूनच आम्ही त्याचे मूल्यांकन करतो. 

सारांश :

अशा रितीने वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्याचा एक भक्कम प्रिंट आणि ऑनलाईन वर्क पोर्टफोलिओ तयार होतो, वेबसाईट आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याची स्वतःची ऑनलाईन आयडेंटिटी बनते. त्याचा पोर्टफोलिओ पाहून त्याला कुठेही सहजच जॉब मिळतो किंवा तो स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. नोकरीसाठी त्याला कुणाच्या शिफारशीची गरज नसते. अभ्यास कसा करायचा याचा अभ्यास झाल्यामुळे तो नवीन नवीन गोष्टी सहजपणे शिकून अपडेट राहतो. वर्षभर शिकलेल्या अनेक विषयांपैकी एखाद्या विषयात तो स्पेशलायझेशन करू शकतो. कारण ग्राफिक डिझाईनमधील करिअर एवढ्यावर संपत नाही. तर ते आयुष्यभर जगायचं असतं. 

 

भागवत पवार,

संस्थापक,
ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे,
9371102678

2 thoughts on “आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन शिक्षण पद्धती नेमकी आहे तरी कशी ?”

Leave a Reply to Manissha Gaikwaad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top