Creative Digital Art

(Graphic Design for Advertising, Printing & Web)

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब  मिडियासाठी कोरल ड्रॉ / फोटोशॉप आणि वेब डिझाईन / ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेससह ग्राफिक डिझाईनचा परिपूर्ण ऑनलाईन कोर्स. 

१०० टक्के प्रॅक्टिकल, असाईनमेंट सबमिशन, शंका निरसन, परीक्षा, आणि सर्टिफिकेटसह सर्वात साधा आणि सोपा ऑनलाईन कोर्स.

माध्यम : मराठी आणि इंग्लिश

काय आहे ग्राफिक डिझाईन?

ग्राफिक डिझाईन ही एक सृजनशील कला आहे. ज्याचा उपयोग, कॉर्पोरेट आयडी, जाहिरात, ब्रॅण्डिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ मेकिंग, विविध प्रकारचे प्रिंटिंग, पब्लिकेशन, पॅकेजिंग, वेब डिझाईन, ब्लॉगिंग, सोशल मिडिया, डिजिटल मार्केटिंग, ऍनिमेशन, फिल्म मेकिंग आदी अनेक क्षेत्रात होतो. ग्राफिक डिझाईन क्षेत्राची व्याप्ती खूपच मोठी आहे आणि याची गरज लहान मोठ्या सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायाला आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनर्सना आज प्रचंड मागणी आहे. नोकरी कि स्वतःचा व्यवसाय? तुम्ही काहीही निवडा, पण त्यासाठी परिपूर्ण प्रॅक्टिकल ज्ञानाची गरज आहे. आणि हेच परिपूर्ण प्रॅक्टिकल ज्ञान आम्ही कित्येक वर्षे देत आलो आहोत. त्यामुळेच शेकडो विद्यार्थ्यांनी त्याचे करिअर घडविले. 

आधुनिक प्रॅक्टिकल शिक्षण पद्धती: (Student Learning Outcome)

आधुनिक शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ई.स. 2000 ते 2010 पर्यंत शिक्षण तज्ज्ञांच्या अधिवेशनांमध्ये नुसती चर्चा सुरु होती, स्थानिक पातळीवर का होईना पण त्या वेळी आम्ही या लर्निंग आऊटकम संकल्पनेचा वापर करायला सुरुवात केली होती. योगायोग असेल कदाचित पण वर्षानुवर्षे आम्ही ज्या पद्धतीने शिकवत होतो त्याच शिक्षण पद्धतीचा त्या शिक्षण तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला. आणि त्या संकल्पनेला लर्निंग आऊटकम असे नाव दिले. आम्ही स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात आणि मराठीत शिकवत होतो पण आम्ही ज्या पद्धतीने शिकवत होतो ते योग्यच होते. आणि हमखास विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारे होते. हे सिद्ध झाले आहे. आणि हाच सिद्ध झालेला अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती आम्ही आता ‘ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिटयूट अँड रिसर्च सेंटर, पुणे’ ह्या  ऑटोनॉमस संस्थेमार्फत आता ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 

टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर काल आणि आज मध्ये खूप फरक आहे. पुस्तक वाचले, फळ्यावर लिहिले, शिक्षकांनी लेक्चर दिले, विद्यार्थ्यांनी  वहीत लिहून घेतले, पाठांतर केले, परीक्षा दिली, सर्टिफिकेट मिळाले. झाले शिक्षण. हे आता इतिहासजमा झाले आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी जे जे काही अभ्यासक्रमात असायला पाहिजे ते ते सारे आम्ही आमच्या अभ्यासक्रमात घेतले आहे. ग्राफिक डिझाईन हा विषय तर  बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा आशयाचा आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही खूप गांभीर्याने घेतली आहे. 

प्रचलित शिक्षक केंद्रित शिक्षणपद्धतीत ज्ञान देणे म्हणजेच शिक्षण ही समजूत रूढ झाली आहे. इथे विद्यार्थ्याला किती समजले आणि त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावहारिक वापर होतो कि नाही याचे मोजमाप नसते. एखादा विषय माहित असणे म्हणजे ज्ञान नव्हे तर तो विषय समजून घेऊन / आत्मसात करून त्यानुसार कृती करणे, त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावहारिक वापर करता येणे. ही खरी शिक्षण पद्धती आहे. जीला आज जग-मान्यता मिळाली आहे. आणि त्यानुसार अभ्यासक्रम बनविले जात आहेत. ह्या प्रगत  विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये जो अभ्यासक्रम असतो त्यामध्ये ‘ Student Learning Outcomes’ ही संज्ञा आज वापरली आहे. आम्ही आजवर ज्या काही मर्यादित विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकविले ती पद्धत योगायोगाने ह्या Student Learning Outcomes सारखीच आहे.  

ऍडव्हान्स ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम :

ऑनलाईन  शिक्षण पद्धतीविषयी शिक्षण क्षेत्रात आज बराच वैचारिक गोंधळ दिसून येत असला तरी तो गोंधळ आम्ही पूर्णपणे दूर करून खऱ्या अर्थाने ऑनलाईन शिक्षण पद्धती अत्यंत सोपी केली आहे. नुसते लाईव्ह लेक्चर दिले म्हणजे ऑनलाईन शिक्षण झाले, असे मुळीच होत नाही. तर विद्यार्थ्याला ते किती समजले, त्याने दिवसभरात काय अभ्यास केला, किती प्रॅक्टिकल केले, नियमित असाईनमेंट सबमिट करणे.  विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करणे. ऑनलाईन वर्क पोर्टफोलिओ बनविणे. अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे तंतोतंत मूल्यमापन परीक्षेच्या आधीच झालेले असते. तेंव्हा परीक्षा ही केवळ औपचारिकता शिल्लक राहते.  (नाहीतर प्रचलित शिक्षण पद्धतीमधील वर्षभर पुस्तकी अभ्यास, वर्षाच्या शेवटी ओढाताण आणि तडजोड करून प्रोजेक्ट सबमिशन आणि तीन तासाची परीक्षा. या ३ तासाच्या परीक्षेवरून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे आम्हाला पटत नाही.)

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अर्ध्या तासाचा व्हिडिओ लेसन  असतो.  आणि त्या प्रमाणे  सराव करून असाईनमेंट सबमिट करण्यासाठी तीन दिवसाची मुदत असते. आठवड्यातून दोन लेसन्स असाईन्मेंट्स सह पूर्ण करायचे असतात. 

 त्याच्या सवडीनुसार तीन दिवसात तो  कधीही  लेसन ओपन करून तो त्या लेसनचा  प्रॅक्टिकल अभ्यास पूर्ण करू शकतो. आणि असाईनमेंट अपलोड करू शकतो. तीन दिवसात असाईनमेंट अपलोड नाही केली तर तो त्या पुढचा  लेसन पाहू शकत नाही. तात्पर्य  नियमित प्रॅक्टिकल अभ्यास असेल तरच त्याला अभ्यास म्हणतात आणि तरच त्याचे करिअर घडते असे आमचे ठाम मत आहे. 

विद्यार्थ्याच्या प्रमोशनसाठी त्याने नियमित केलेल्या वर्कचा ऑनलाईन पोर्टफोलिओ बनवला जातो. ज्याचा उपयोग त्याला नोकरी / व्यवसायाच्या वेळी नक्कीच होतो. कंपन्या त्याचा पोर्टफोलिओ पाहून त्याला डायरेक्ट ऑफर देऊ शकतात. किंवा व्यवसायामध्ये याचा उपयोग प्रमोशनसाठी करता येतो.  

कोर्सचे स्वरूप : Student Learning Outcomes :

एक तास ट्रेनिंग,  एक तास प्रॅक्टिकल, म्हणजे दोन तास क्लास आणि दररोज किमान ४ तास प्रॅक्टिकल होमवर्क असलेला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे ग्राफिक डिझाईन प्रोजेक्ट करण्यास सक्षम होतो.
1. ज्या क्लाएंटचे जे ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे, त्याविषयी पूर्ण माहिती घेणे. जी त्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असते.
2. परिणामकारक डिझाईन बनविण्याच्या दृष्टीने सर्व बाजूनी विचार करणे. आणि विषयाला पूरक अशा एक – दोन संकल्पना (Ideas) निश्चित करणे.
3. निश्चित केलेल्या संकल्पनेला अनुसरून डिझाईनमध्ये वापरण्यासाठी फोटोग्राफी करणे.
4. डिझाईन संकल्पनेनुसार मजकूर लिहिणे. रंगसंगती ठरविणे.
5. फायनल डिझाईनचा संभाव्य लेआऊट डोळ्यासमोर ठेऊन कोऱ्या पेपरवर पेन्सिलने रेखाटने बनविणे.
6. योग्य वाटणाऱ्या दोन-तीन  रेखाटनाप्रमाणे कॉम्प्युटरवर लेआऊट बनविणे.
7. डिझाईनमधील व्हेक्टर ग्राफिकसाठी कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर वापरणे.
8. डिझाईनमधील रास्टर ग्राफिक साठी फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरणे.  
9. डिझाईन संबंधित प्रिंटिंगचा प्रकार आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याप्रमाणे फायनल डिझाईन / आर्टवर्क बनवणे.
10. प्रिंटिंगचे विविध प्रकार : स्क्रिन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हीअर प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग.
11. कोर्सच्या शेवटी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तयारी करणे. उदा. लोगो डिझाईन, कॉर्पोरेट आयडी.  स्टेशनरी, प्रोमोशनल मटेरियल तयार करणे. नोकरी करण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करणे. इ. 

Web Media
1. Domain and Hosting Management.
2. Blogging. (WordPress).
3. Create Website without coding (WordPress).
4. Create Social Media Designs for Branding. (Digital Marketing)

Scroll to Top