Work, Terms and Conditions

चॅनल पार्टनर बनण्यासाठी नियम / अटी आणि थोडक्यात कामाचे स्वरूप खालील प्रमाणे आहे. 

 1. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करणे. 
 2. करिअरच्या दृष्टीने ग्राफिक डिझाईन कोर्सचे महत्व विद्यार्थ्याला समजून सांगणे. आणि त्याला कोर्स घेण्यास प्रवृत्त करणे. 
 3. कोर्स फी मिळाल्याची खात्री करून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला संबंधित कोर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी Enrollment Key देणे. 
 4. चॅनल पार्टनर म्हणून काम करण्यासाठी Rs. 5,000/- नॉन रिफंडेबल डिपॉझिट आहे. 
 5. चॅनल पार्टनरला एकूण 10 Enrollment Keys देण्यात येतील. 
 6. कोर्स फीमध्ये डिस्काऊंट देण्यासाठी Rs. 1,000/-, Rs. 2,000/- आणि Rs. 3,000/- अशी डिस्काऊंट कुपन्स देण्यात येतील. विद्यार्थ्याला डिस्काउंट द्यायचा कि नाही हे चॅनल पार्टनरने ठरवायचे आहे.
 7. विद्यार्थ्याकडून मिळालेल्या फीच्या 40 टक्के कमिशन चॅनल पार्टनरला दिले जाईल. 
 8. चॅनल पार्टनरने ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स फी घेतल्यानंतरच Enrollment Key आणि डिस्काऊंट कुपन कोड द्यायचा आहे. 
 9. विद्यार्थी कोर्स फी प्रवेश घेतेवेळी जर ऑनलाईन भरणार असेल तर त्याचा कोर्स ऍटोमेटिक ऍक्टिव्हेट होईल. कोर्स ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याला Enrollment key देण्याची गरज नाही. त्याला फक्त डिस्काउंट कुपन देऊन फी मध्ये सवलत मिळेल. परंतु अशा डायरेक्ट ऑनलाईन फी भरलेल्या विद्यार्थ्याचे  नाव चॅनल पार्टनरने संस्थेला कळविणे गरजेचे आहे. 
 10. चॅनल पार्टनर ने विद्यार्थ्यांकडून फी जर कॅश ने घेतली असेल तर प्रवेश घेताना Direct Bank Transfer हा ऑप्शन निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 
 11. कमिशन वजा करून कोर्सफी संस्थेच्या खात्यावर जमा केल्यानंतर कोर्स ऍक्टिव्हेट केला जाईल. 
 12. आमच्या वेबसाईटवर तुमचे नाव चॅनल पार्टनर म्हणून डिस्प्ले केले जाईल. 
 13. तुमचे व्हिजिटिंग कार्ड आणि तुमचे संस्था आय कार्ड सॉफ्ट कॉपी पाठवली जाईल. 
Scroll to Top