ग्राफिक डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सपैकी कोरल ड्रॉ हे एक व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी लागणारे ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी होतो. ज्यामध्ये ड्रॉईंग, कलरिंग आणि इफेक्टस वापरून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बनविली जातात. खास करून आर्टिस्टसाठी बनविलेलेल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी, लिफलेट, फोल्डर, स्टिकर, पोस्टर, जाहिरात, बॅनर, होर्डिंग अशा अनेक प्रकारची प्रिंट डिझाईन्स बनवू शकता. डिझाईनची संकल्पना एकदा फायनल झाली, कि ती संकल्पना प्रत्यक्षात दृश्य रूपात आणण्यासाठी कोरल ड्रॉ ह्या टूलचा उपयोग होतो. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी विचार करणे, लिहिणे, डिझाईनसाठी कल्पना सुचणे, फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, प्रिंट आणि वेब टेक्निक्स, ऑनलाईन मार्केटिंग अशा इतर अनेक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. आणि हे सारे स्टेप बाय स्टेप शिकावे लागते. कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंग आणि कलरिंग ही फक्त सुरुवात आहे.
ह्या कोर्समध्ये फक्त टूल्स आणि मेनूचा अभ्यास नाही, तर ग्राफिक डिझाईन ज्या पद्धतीने बनते आणि ते बनविताना ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या साऱ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलसह साध्या, सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहेत. हा कोर्स तुम्ही नियमित प्रॅक्टिकल करून पूर्ण केलात तर तुमची खात्री होईल कि, खरंच, ग्राफिक डिझाईन खूप सोपं आहे.