फोटोशॉप हे फोटो एडिटिंग / फिनिशिंगसाठी जगभर वापरण्यात येणारे एकमेव सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग प्रामुख्याने जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब आणि अनिमेशन क्षेत्रात अधिक केला जातो. फोटोग्राफर आणि आर्टिस्ट यांच्या कल्पना अगदी सहजपणे दृश्य रूपात आणण्यासाठी या सॉफ्टवेअरमुळे शक्य झाले आहे. सहजासहजी विश्वास बसणार नाही असे हवे ते आणि हवे तसे रिअल व्हिज्युअल बनविणे हे फोटोशॉपमुळे शक्य झाले आहे. फोटोशॉप हे खूप मोठे आणि विविध क्षेत्रात वापरले जाणारे सॉफ्टवेअर असले तरी ते एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात शिकविणारा हा ऑनलाईन कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही जाहिरात, प्रिंटिंग, वेबसाठी लागणारी कोणतीही इमेज अगदी सहजपणे एडीट / फिनिश करू शकाल. आणि जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुमचे कल्पक लॉजिक वापरून अधिकाधिक चांगल्या कलाकृती बनवू शकाल. एकदा फोटोशॉपची मूळ संकल्पना समजली कि तुम्ही फोटोशॉपच्या कोणत्याही व्हर्जन मध्ये अगदी आरामात काम करू शकता. कारण फोटोशॉपममधील कलाकृती ही सॉफ्टवेअरच्या व्हर्जनवर नाही तर ती आर्टिस्टच्या कल्पक बुद्धीच्या जोरावर तयार होते. सॉफ्टवेअर हे फक्त साधन आहे. आर्टिस्ट आणि फोटोग्राफर डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या काम करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करूनच हे सॉफ्टवेअर बनविले आहे. तुम्हीही हे सॉफ्टवेअर शिकून तुमच्या कल्पनेने विषयानुरूप कलाकृती बनवू शकता.
