Current Status
Not Enrolled
Price
₹ 5,000/-
Get Started
This course is currently closed

काय आहे वर्डप्रेस ?

ग्राफिक डिझाईनसाठी व्हेक्टर आणि रास्टर सॉफ्टवेअर्सचा अभ्यास झाल्यानंतर प्रिंट मिडिया प्रमाणे वेब मिडियासाठीसुद्धा ग्राफिक डिझाईनची गरज असते. वेब साईट्स आणि ब्लॉगिंगची गरज प्रत्येक व्यवसायाला आहे. एखाद्या व्यवसायाच्या जाहिरात, प्रमोशनसाठी जेंव्हा तुम्ही प्रिंट मिडियासाठी डिझाईन करता, त्याच वेळी त्या व्यवसायाची वेबसाईट आणि ब्लॉग बनविणे तितकेच गरजेचे असते. म्हणून जगातील सुमारे ४० टक्के वेबसाईट्स आणि ब्लॉग्ज ज्या प्लॅटफॉर्मवर बनविले आहेत. त्या वर्डप्रेस प्लॅटफॉर्मचा हा प्रॅक्टिकल कोर्स आहे. वेबसाईट बनविण्यासाठी HTML, CSS, JS, PHP, MySQL, .Net, MSSql आणि गरजेनुसार कोडींग संबंधित इतर अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आणि त्या गोष्टी शिकण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. पण वर्डप्रेसमध्ये वेबसाईट आणि ब्लॉगिंग शिकण्यासाठी तुलनेत खूपच कमी वेळ लागतो. बेसिक कोडींगचे ज्ञान असेल तर उत्तमच पण कोडींगचे ज्ञान नसेल तरीही वर्डप्रेसमध्ये तुम्ही स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट्स बनवू शकता. आणि त्यासाठी विषयानुरूप  क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवावी लागतात. डोमेन नेम रजिस्ट्रेशनपासून सर्वर मॅनेजमेंट, होस्टिंग, वेब डिझाईन, ब्लॉगिंग, कॉर्पोरेट ई-मेल, वेब साईट प्रमोशन आदी अनेक वेब संबंधित गोष्टींचा प्रॅक्टिकल अभ्यास या कोर्समध्ये आहे. या कोर्स कालावधीत तुमची स्वतःची वेब साईट आणि ब्लॉग बनवून घेतला जातो. ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कस्टमरची वेबसाईट आणि ब्लॉग बनविण्यासाठी होतो.

Scroll to Top