जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे या संस्थेने ग्राफिक डिझाईनमधील ऑनलाईन करिअर कोर्सेसचा उपक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या आणि कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने हे पाच ऑनलाईन कोर्सेस अत्यंत उपयुक्त आहेत. 

खास वैशिष्ठे :

  • ग्राफिक डिझाईनच्या तब्बल २५ वर्षांहून अधिक प्रॅक्टिकल अनुभवातून तयार केलेला एकदम साधा आणि सोपा 100 टक्के प्रॅक्टिकल अभ्यासक्रम. 
  •  एकदम साधी आणि सोपी ऑनलाईन शिकण्याची पद्धत. 
  • एकदम साधी आणि सोपी मायबोली मराठी भाषा. 
  • केंव्हाही आणि कुठेही शिका. तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. 

कोर्स 01 : Corel Draw for Graphic Design 

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकावच लागतं. त्यासाठी कोरल ड्रॉचा हा सर्वात सोपा मराठी ऑनलाईन कोर्स करा.

काय आहे कोरल ड्रॉ ?

ग्राफिक डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सपैकी कोरल ड्रॉ हे एक व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी लागणारे ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी होतो. ज्यामध्ये ड्रॉईंग, कलरिंग आणि इफेक्टस वापरून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बनविली जातात. खास करून आर्टिस्टसाठी बनविलेलेल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी, लिफलेट, फोल्डर, स्टिकर, पोस्टर, जाहिरात, बॅनर, होर्डिंग अशा अनेक प्रकारची प्रिंट डिझाईन्स बनवू शकता. डिझाईनची संकल्पना एकदा फायनल झाली, कि ती संकल्पना प्रत्यक्षात दृश्य रूपात आणण्यासाठी कोरल ड्रॉ ह्या टूलचा उपयोग होतो. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी विचार करणे, लिहिणे, डिझाईनसाठी कल्पना सुचणे, फोटोग्राफी, फोटो एडिटिंग, प्रिंट आणि वेब टेक्निक्स, ऑनलाईन मार्केटिंग अशा इतर अनेक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. आणि हे सारे स्टेप बाय स्टेप शिकावे लागते. कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंग आणि कलरिंग ही फक्त सुरुवात आहे.

ह्या कोर्समध्ये फक्त टूल्स आणि मेनूचा अभ्यास नाही, तर ग्राफिक डिझाईन ज्या पद्धतीने बनते आणि ते  बनविताना ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या साऱ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलसह साध्या, सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या आहेत. हा कोर्स तुम्ही नियमित प्रॅक्टिकल करून पूर्ण केलात तर तुमची खात्री होईल कि, खरंच, ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ ऑनलाईन शिकणं खूप सोपं आहे.

कोर्स 02 : Photoshop for Graphic Design

ग्राफिक डिझाईनमध्ये हमखास करिअर करण्यासाठी व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर इमेज एडिटिंगसाठी रास्टर ग्राफिक डिझाईन शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी फोटोशॉपचा हा सर्वात सोपा मराठी ऑनलाईन कोर्स करा.

काय आहे फोटोशॉप ?

फोटोशॉप हे फोटो एडिटिंग / फिनिशिंगसाठी जगभर वापरण्यात येणारे एकमेव सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग प्रामुख्याने जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब आणि अनिमेशन क्षेत्रात अधिक केला जातो. फोटोग्राफर आणि आर्टिस्ट यांच्या कल्पना अगदी सहजपणे दृश्य रूपात आणण्यासाठी या सॉफ्टवेअरमुळे शक्य झाले आहे. सहजासहजी विश्वास बसणार नाही असे हवे ते आणि हवे तसे रिअल व्हिज्युअल बनविणे हे फोटोशॉपमुळे शक्य झाले आहे. फोटोशॉप हे खूप मोठे आणि विविध क्षेत्रात वापरले जाणारे सॉफ्टवेअर असले तरी ते एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात शिकविणारा हा ऑनलाईन कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही जाहिरात, प्रिंटिंग, वेबसाठी लागणारी कोणतीही इमेज अगदी सहजपणे एडीट / फिनिश करू शकाल. आणि जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुमचे कल्पक  लॉजिक वापरून अधिकाधिक चांगल्या कलाकृती बनवू शकाल. एकदा फोटोशॉपची मूळ संकल्पना समजली कि तुम्ही फोटोशॉपच्या कोणत्याही व्हर्जन मध्ये अगदी आरामात काम करू शकता. कारण फोटोशॉपममधील कलाकृती ही सॉफ्टवेअरच्या व्हर्जनवर नाही तर ती आर्टिस्टच्या कल्पक बुद्धीच्या जोरावर तयार होते. सॉफ्टवेअर हे फक्त साधन आहे. आर्टिस्ट आणि फोटोग्राफर डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या काम करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करूनच हे सॉफ्टवेअर बनविले आहे. तुम्हीही हे सॉफ्टवेअर शिकून तुमच्या कल्पनेने विषयानुरूप कलाकृती बनवू शकता.

कोर्स 03 : Pre-Press Design and Artwork

व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक्स शिकल्यानंतर प्रिंट मिडियासाठी ग्राफिक डिझाईन बनविताना विविध प्रकारच्या प्रिंटिंग प्रोसेसचा विचार करून डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्टवर्क बनवावे लागते. त्यासाठी हा परिपूर्ण ऑनलाईन मराठी कोर्स करा.

काय आहे प्रि-प्रेस डिझाईन ? 

प्रि-प्रेस म्हणजे एखाद्या डिझाईनच्या प्रिंटिंगसाठी प्रिंटिंगपूर्वी करावयाच्या स्टेप्स. म्हणजे यामध्ये डिझाईनची कल्पना सुचण्यापासून डिझाईनसाठी आवश्यक त्या सर्व घटकांची निर्मिती करणे, उदा. फोटोग्राफी करणे, मजकूर लिहिणे, प्रिंटिंगच्या प्रकारानुसार साईज ठरविणे,  लेआऊट करणे, कलरस्कीम ठरविणे, प्रिंटिंगच्या प्रकारानुसार फायनल आर्टवर्क बनविणे, त्यासाठी प्रिंटिंगच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे, उदा. स्क्रिन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हिअर प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग इ. थोडक्यात संबंधित प्रिंटिंग प्रकाराचा सारासार विचार करून प्रिंटिंगला देण्यासाठी एखाद्या डिझाईनचे फायनल प्रिंट रेडी आर्टवर्क बनविणे म्हणजे प्रि-प्रेस डिझाईन अँड आर्टवर्क. ह्या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी व्हेक्टर बेस कोरल ड्रॉ आणि रास्टर बेस फोटोशॉप अशा किमान दोन सॉफ्टवेअर्सचा ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास झालेला असला पाहिजे. थोडक्यात प्रि-प्रेस डिझाईन अँड आर्टवर्क हा कोर्स करण्यासाठी कोरल ड्रॉ फॉर ग्राफिक डिझाईन आणि फोटोशॉप फॉर ग्राफिक डिझाईन हे दोन्ही कोर्स प्रथम पूर्ण करण्याची गरज आहे. 

कोर्स 04 : WordPress : Website and Blogging

प्रिंट मिडिया ग्राफिक डिझाईननंतर वेब मिडियासाठी वेब डिझाईन शिकावं लागतंच. कारण इंटरनेटच्या युगात कोणत्याही व्यवसायाची ही प्रमुख गरज आहे. म्हणून वेबसाईट आणि ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेसचा हा एकदम सोपा ऑनलाईन मराठी कोर्स करा.

काय आहे वर्डप्रेस ?

ग्राफिक डिझाईनसाठी व्हेक्टर आणि रास्टर सॉफ्टवेअर्सचा अभ्यास झाल्यानंतर प्रिंट मिडिया प्रमाणे वेब मिडियासाठीसुद्धा ग्राफिक डिझाईनची गरज असते. वेब साईट्स आणि ब्लॉगिंगची गरज प्रत्येक व्यवसायाला आहे. एखाद्या व्यवसायाच्या जाहिरात, प्रमोशनसाठी जेंव्हा तुम्ही प्रिंट मिडियासाठी डिझाईन करता, त्याच वेळी त्या व्यवसायाची वेबसाईट आणि ब्लॉग बनविणे तितकेच गरजेचे असते. म्हणून जगातील सुमारे 40 टक्के वेबसाईट्स आणि ब्लॉग्ज ज्या प्लॅटफॉर्मवर बनविले आहेत. त्या वर्डप्रेस प्लॅटफॉर्मचा हा प्रॅक्टिकल कोर्स आहे. वेबसाईट बनविण्यासाठी HTML, CSS, JS, PHP, MySQL, .Net, MSSql आणि गरजेनुसार कोडींग संबंधित इतर अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आणि त्या गोष्टी शिकण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. पण वर्डप्रेसमध्ये वेबसाईट आणि ब्लॉगिंग शिकण्यासाठी तुलनेत खूपच कमी वेळ लागतो. बेसिक कोडींगचे ज्ञान असेल तर उत्तमच पण कोडींगचे ज्ञान नसेल तरीही वर्डप्रेसमध्ये तुम्ही स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट्स बनवू शकता. आणि त्यासाठी विषयानुरूप  क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवावी लागतात. डोमेन नेम रजिस्ट्रेशनपासून सर्वर मॅनेजमेंट, होस्टिंग, वेब डिझाईन, ब्लॉगिंग, कॉर्पोरेट ई-मेल, वेब साईट प्रमोशन आदी अनेक वेब संबंधित गोष्टींचा प्रॅक्टिकल अभ्यास या कोर्समध्ये आहे. या कोर्स कालावधीत तुमची स्वतःची वेब साईट आणि ब्लॉग बनवून घेतला जातो. ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कस्टमरची वेबसाईट आणि ब्लॉग बनविण्यासाठी होतो. 

कोर्स 05 : Social Media Design and Branding

प्रिंट आणि वेब मीडियानंतर हल्ली सर्वात लोकप्रिय असलेला मीडिया म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक पोस्टिंग किंवा युट्युब चॅनलसाठी व्हिडीओ बनवून बिझनेस प्रमोशन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध सोशल मिडिया डिझाईनचा हा ऑनलाईन मराठी कोर्स करा.

काय आहे सोशल मिडिया डिझाईन ?

प्रिंट मिडिया, वेब साईट आणि ब्लॉगिंग नंतर कोणत्याही व्यवसायाच्या ऑनलाईन जाहिरात, मार्केटिंग, प्रमोशनसाठी सर्रास वापरला जाणारा मिडिया म्हणजे सोशल मिडिया. फ्रेंडशिप, मेसेजिंग, म्युझिक, ज्ञान, विज्ञान, शिक्षण, बातम्या आणि करमणुकीच्या आकर्षणापोटी विविध प्रकारची माहिती आणि विशेषतः व्हिडीओज पाहण्याची चटक लागलेल्या लोकांची एक खूप मोठी वर्दळ आज इंटरनेटवर पाहायला मिळते. ही जी नियमित जाणवणारी आणि जागृत असणारी वर्दळ म्हणजेच सोशल मीडिया. जो तो या सोशल मीडियाचा चाहता बनला आहे. आणि त्यामुळेच कोणत्याही व्यवसायाच्या जाहिरात / प्रमोशनसाठी हे एक सर्वात मोठे व्यासपीठ किंबहुना एक मोठं मार्केट निर्माण झाली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यासपीठावर उत्तम रीतीने प्रेझेंट होण्यासाठी कल्पक ग्राफिक डिझाईनच लागते. त्यामुळे सोशल मीडियामध्ये अर्थपूर्ण लिखाणासोबत उत्तम फोटोग्राफी, फोटोमिक्सींग, व्हिडीओ शूटिंग, व्हिडीओ एडिटिंगसह कल्पक जाहिराती आणि मार्केटिंगला लागणारे आकर्षक प्रमोशनल मटेरियल बनविण्यासाठी जे ग्राफिक डिझाईन लागते ते या कोर्समध्ये विद्यार्थ्याला शिकायला मिळतं. ज्याचा उपयोग त्याला स्वतःचे आणि पर्यायाने त्याच्या कस्टमरचे उत्तम रितीने प्रमोशन करण्यासाठी होतो. नोकरी मिळण्यासाठी याचा उपयोग होतोच होतो. शिवाय तुम्ही प्रिंट आणि वेब ग्राफिक डिझाईन बरोबरच डिजिटल मार्केटिंगचाही व्यवसाय करू शकता. 

100 टक्के प्रॅक्टिकल असलेले हे पाच मराठी कोर्सेस आम्ही क्रमशः ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. हे कोर्सेस तुम्ही तुमच्या घरातून किंवा तुमच्या नजीकच्या सेंटरमधून ऑनलाईन शिकू शकता. संपूर्ण कोर्स प्रक्रियेत कोर्सला प्रवेश घेण्यापासून, प्रॅक्टिकलसह लेसन्स पूर्ण करणे. असाईनमेंट्स सबमिशन, परीक्षा आणि शेवटी सर्टिफिकेट मिळेपर्यंत सर्व काही ऑनलाईन असते. प्रत्येक लेसन पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला ई-मेल जातो आणि विद्यार्थ्याला काही शंका असतील तर तो त्या ई-मेलला रिप्लाय देऊन किंवा डायरेक्ट कॉल करून विचारू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top