महाराष्ट्रातील ग्राफिक डिझाईनची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी व त्यांच्या अंगभूत कलागुणांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाव देऊन त्यांचे करियर घडावे म्हणून ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, पुणे ही संस्था कार्यरत आहे. जाहिरात, प्रिंटिंग, वेब, ऍनिमेशन, फिल्ममेकिंग आदी क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर्सची नितांत आवश्यकता आहे., परंतु सदर इंडस्ट्रीजमध्ये कुशल ग्राफिक डिझाईनर्सची खूपच कमतरता आहे. विविध क्षेत्रात त्यांना नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. 

सध्यस्थितीत ग्राफिक डिझाइनचे कोर्सेस इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत, परंतु भरमसाठ फी आणि इंग्लिश भाषेच्या ज्ञानाअभावी ग्राफिक डिझाईन शिकण्याची पात्रता असून देखील विद्यार्थ्यांना शिकता येत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही सर्व कोर्सेस मराठीतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर ग्राफिक आर्ट इन्स्टिट्यूट्सच्या शाखा (फ्रॅन्चाइसीज) सुरु करीत आहोत. 

आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हे कोर्सेस सुरु करून तुमच्या भागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही आपणास नम्र विनंती.

तुमच्या शहरात तुमची स्वतःची ग्राफिक आर्ट ऑनलाईन लर्निंग इन्स्टिट्युट (फ्रॅन्चाइसी) सुरु करण्यास इच्छुक असाल तर खालील फॉर्म भरून पाठवा.

=
Scroll to Top