100 टक्के प्रॅक्टिकल असलेले हे पाच कोर्सेस आम्ही तुमच्या संस्थेसाठी क्रमशः ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. कारण ग्राफिक डिझाईनमधील हमखास करिअर साठी ज्या क्रमाने शिकले पाहिजे तोच अनुभवातून सिद्ध झालेला क्रम आम्ही निश्चित केला आहे. सर्वप्रथम ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना काय आहे आणि ग्राफिक डिझाईन ऑनलाईन शिकण्याची पद्धत काय आहे ते समजण्यासाठी चार लेसन्स, असाईनमेंट सबमिशन, एक्साम ते सर्टिफिकेटसह असलेला ऑनलाईन फ्री डेमो ग्रुप कोर्स देत आहोत, जेणेकरून ऑनलाईन ग्रुप कोर्स पद्धतीची तुमची ओळख होईल. ग्राफिक डिझाईनमधील करिअरचे महत्व आणि ही ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना तसेच ऑनलाईन शिकण्याची पद्धत समजून घेतल्यानंतर आमचा पहिला ऑनलाईन ग्रुप कोर्स तुम्ही तुमच्या संस्थेत सुरु करू शकता.

 

ऑनलाईन ग्रुप कोर्स म्हणजे काय?

विद्यार्थी जसा वर्गामध्ये प्रत्यक्ष शिकतो, तसाच एक ग्रुप म्हणजे विशिष्ठ विषयाचा ऑनलाईन वर्ग. ऑनलाईन ग्रुप कोर्समध्ये सर्व विद्यार्थी एकाच वेळी किंवा ते दिवसभरात कोणत्याही वेळेत त्यांच्या सवडीनुसार शिकू शकतात. 

तुमच्या संस्थेत वरील पाच कोर्सेसचे प्रत्येकी एक या प्रमाणे स्वतंत्र पाच ग्रुप्स बनवायचे असतात. एका कोर्स ग्रुपमध्ये किती विद्यार्थी हवेत ते तुम्ही ठरवू शकता. तेवढ्या सीट्स  तुम्ही ऑर्डर करायच्या असतात.  प्रत्येक ग्रुपला तुम्ही तुम्हाला हवे ते नाव देऊ शकता. पण कोणत्या कोर्सचा ग्रुप आहे ते समजण्यासाठी ग्रुपच्या नावामध्ये संस्थेच्या संक्षिप्त नावासह कोर्सचे संक्षिप्त नाव असावे. उदा. Pragati College of Arts, Pune हे कॉलेजचे नाव असेल तर तुमच्या ग्रुप कोर्सची नावे Pragati Pune : Corel Draw, Pragati Pune : Photoshop अशी असू शकतात. प्रत्येक विषयाच्या ग्रुपसाठी तुमच्या संस्थेतीलच एक ग्रुप लीडर नेमायचा आहे. ग्रुप लीडर हा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थीही असू शकतो. ग्रुप कोर्सची ऑनलाईन संपूर्ण मॅनेजमेंट ग्रुप लीडरच्या हातात असते. किंबहुना ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांवर ग्रुप लीडरचा कंट्रोल असतो. सर्व विषयांच्या ग्रुप्सचा एकच ग्रुप लीडर असतो किंवा प्रत्येक विषयाच्या ग्रुपसाठी तुम्ही स्वतंत्र ग्रुप लीडर नेमू शकता. ग्रुप लीडर त्याच्या कंट्रोल पॅनेलमधून ग्रुप कोर्स हॅण्डल करतो. त्यामध्ये खालील गोष्टी येतात. 

1. विद्यार्थ्याला ग्रुप कोर्समध्ये प्रवेश देणे.

2. कोर्स फी मिळाल्याची खात्री करून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला संबंधित कोर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी Enrollment Key पाठविणे. 

3. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मिळालेल्या त्या त्या लेसनच्या असाईनमेंट्स चेक करून Approve करणे. कारण असाईनमेंट approve झाल्याशिवाय पुढचा लेसन ओपन होत नाही. 

4. कोर्स सीट्स संपल्यानंतर नवीन सीट्ससाठी ऑर्डर देणे.

5. कोर्स रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट, असाईनमेंट्स रिपोर्ट, एक्झाम रिपोर्ट पाहणे, 

6. नवीन ग्रुप लीडर ऍड करणे.

7. गरजेनुसार एक किंवा अनेक विद्यार्थ्यांना ईमेल पाठवणे.

कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ह्या कोर्सेसचा उपयोग नक्कीच होतो. किंबहुना ग्राफिक डिझाईनमध्ये विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवू शकतो. प्रत्येक लेसनमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल करून त्या लेसनवर आधारित दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. असाईनमेंट्स सबमिट केल्यानंतरच पुढचा लेसन ओपन होणार आहे. ज्या त्या लेसनची असाईनमेंट त्या त्या दिवशीच पूर्ण करायची असल्याने विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास होतो. 30 लेसनचा कोर्स किमान दोन महिन्यात पूर्ण करायचा आहे. सर्व लेसन्स पूर्ण करून असाईनमेंट्स सबमिट केल्यानंतर एक्झाम पेज ओपन होईल. 100 मार्कांची परीक्षा दिल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांला निकाल मिळतो, आणि ज्या संस्थेच्या ज्या कोर्स ग्रुपमध्ये विद्यार्थी असेल त्या संस्थेच्या त्या कोर्स ग्रुपच्या नावाने सर्टिफिकेट मिळते.  विद्यार्थ्याला प्रवेश घेतल्यापासून 100 दिवस कोर्स ऑनलाईन उपलब्ध असतो. या कालावधीत तुम्ही तुमच्या ग्रुप पेजवर जाऊन कधीही सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता.  

तुमच्या संस्थेत ग्राफिक आर्टचे मराठी ऑनलाईन ग्रुप कोर्सेस सुरु करण्यापूर्वी ऑनलाईन फ्री डेमो कोर्स ग्रुप तयार करून, ही अद्ययावत ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम प्रत्यक्ष पाहू शकता. यामध्ये विद्यार्थ्याच्या कोर्स प्रवेशापासून असाईनमेंट सबमिशन, परीक्षा ते फायनल सर्टिफिकेट मिळेपर्यंत सर्व गोष्टी आहेत.  तुम्ही ह्या फ्री डेमो ग्रुप कोर्सचा डेमो पाहून ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. काही शंका आल्या तर विचारू शकता. 

ग्राफिक डिझाईनचा फ्री ऑनलाईन डेमो ग्रुप कोर्स कसा सुरु कराल?

स्टेप 1 : Registration : 

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि ऑनलाईन ग्रुप कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम  graphicart.in या वेबसाईटला जाऊन रजिस्टर करायचे आहे. प्रत्येक कोर्स ग्रुपला एक ग्रुप लीडर असतो. तो शिक्षक किंवा एखादा विद्यार्थीही असू शकतो. जो ग्रुप लीडर होणार आहे त्यानेही प्रथम रजिस्टर करायचे आहे. रजिस्टर करण्यासाठी  Graphicart.in साईट ओपन करून Register मेनूवर क्लिक करा. रजिस्टर फॉर्म भरा.  सबमिट करा. 

स्टेप 2 : Email Verification :  ईमेल व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या ईमेलमधील अकाउंट ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करून अकाउंट ऍक्टिव्हेट करा.

अकाऊंट ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर लॉगिन व्हा.

स्टेप ३ : Become a Group Leader : रजिस्टर झालेल्यापैकी कोणीही ग्रुप लीडर  होऊ शकतो. जो ग्रुप लीडर होणार आहे त्याने graphicart.in ला लॉगिन करा आणि मेनूमध्ये जाऊन Apply for Center वर  क्लिक करा, आणि तो फॉर्म भरून पाठवा. 

स्टेप 4 : सेंटर ऍप्लिकेशन फॉर्म मिळाल्यानंतर 24 तासात आम्ही तुम्हाला कॉल करू, आणि तुमचा डेमो कोर्स ग्रुप ऍक्टिव्हेट करून देऊ.  आम्ही तुमचा ग्रुप कोर्स ऍक्टिव्हेट केल्यावर New Group Created म्हणून तुम्हाला ई-मेल येईल. फ्री डेमो ग्रुप कोर्समध्ये तुम्ही स्वतः (ग्रुप लीडर) एनरॉल झाल्याचाही तुम्हाला ई-मेल येईल.

ग्रुप कोर्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जेंव्हा ग्रुप लीडर लॉगिन होईल तेंव्हा डायरेक्ट ग्रुप मॅनेजमेंट पेज ओपन होईल.

स्टेप 5: या पेजवरून ग्रुप लीडर त्याच्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना डेमो कोर्ससाठी प्रवेश देतो. तसेच ग्रुप कोर्समधील विद्यार्थी मॅनेज करतो. 

विद्यार्थ्याला ग्रुप कोर्समध्ये प्रवेश देणे : विद्यार्थ्याना ग्रुप कोर्सला प्रवेश देण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना मुख्य साईटवर (graphicart.in) फ्री रजिस्टर करून ईमेल व्हेरिफिकेशन करायला सांगणे. थोडक्यात ग्रुप कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांने रजिस्टर करून लॉगिन होणे गरजेचे आहे.   

Step 6 : लॉगिन झाल्यानंतर संबंधित सेंटरचे ग्रुप पेज ओपन करा. Demo Group Course थम्बनेल मधील See More वर क्लिक करा. 

ग्रुप कोर्स पेज ओपन होईल. 

ग्रुप कोर्स पेजवरील Join This Center Course बटनवर क्लिक करा. 

Step 8 : त्या सेंटरचा Course Enrollment Key Request फॉर्म ओपन होईल. तो भरा आणि Submit करा. 

Step 9 : विद्यार्थ्याने Course Enrollment Key Request फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुप लीडरला ईमेल मिळेल. विद्यार्थ्यांची कोर्स फी जमा झाल्याची खात्री करून ग्रुप लीडरने संबंधित विद्यार्थ्याला Course Enrollment Key पाठवायची आहे. त्यासाठी… 

Step 10 : ग्रुप मॅनेजमेंट पेजवरील Users ड्रॉप डाऊन  बटन मधील Add one वर क्लिक करा. 

Step 11 : ओपन झालेल्या फॉर्म मधील Send enrollment key सिलेक्ट करा. 

 विद्यार्थ्याच्या मिळालेल्या ईमेलमधील माहितीनुसार First name, Last name आणि Email टाकून फॉर्ममधील Add User बटनवर क्लिक करा.  विद्यार्थ्याला Course Enrollment Key चा ईमेल जाईल. 

(एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना Course Enrollment Keys पाठवण्यासाठी ग्रुप मॅनेजमेंट पेजवरील Users ड्रॉप डाऊन मेनूमधील Add multiple मेनूवर क्लिक करा. किंवा Users ड्रॉप डाऊन मेनूमधील Upload Users मेनूवर क्लिक करून विद्यार्थ्यांची लिस्ट असलेली CSV फाईल अपलोड करा. किंवा Download Keys मेनूवर क्लिक करा आणि Enrollment Keys डाऊनलोड करून तुम्ही विद्यार्थ्याला वैयक्तिक देऊ शकता.)

Step 12 : विद्यार्थ्याने कोर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी प्रथम graphicart.in साईटला लॉगिन व्हा. तुमचा ई-मेल ओपन करा. ग्रुप लीडरकडून आलेला Course Enrollment Key चा ईमेल ओपन करा. या ई-मेलमध्ये ग्रुप कोर्स ऍक्टिव्हेशन पेजची लिंक आणि एनरोलमेंट की असेल.  

प्रथम साईटला लॉगिन व्हा. या ई-मेलमधील Enrollment Key कॉपी करा.  आणि ग्रुप कोर्स ऍक्टिव्हेशन पेजच्या लिंकवर क्लिक करा. 
Group Course activation पेज ओपन होईल. 

Step 13 : Enrollment Key समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये कॉपी केलेली Enrollment Key पेस्ट करा. आणि Redeem Code बटनवर क्लिक करा. तुमचा कोर्स ऍक्टिव्हेट होईल.   

Step 14 : आता तुमच्या ग्रुप पेजवर जाऊन Graphic Design Demo Course वर क्लिक करा. कोर्स पेज ओपन होईल. 

Step 15 : आता Demo Lesson 01 वर क्लिक करा. 

Step 16 : ऑनलाईन क्लासरूममध्ये डेमो लेसन  01  ओपन होईल. आता या लेसनमधील हा इंट्रो व्हिडीओ लेसन पाहून झाल्यावर Mark Complete बटनवर क्लिक करा. म्हणजे Lesson 02 ओपन होईल. 

 Step 17 : आता लेसन दोनमधील व्हिडीओ लेसन पाहून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करायचे आहे. लेसनवर आधारित त्या लेसनखाली दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करायच्या असतात. आणि किमान एक असाईनमेंट सबमिट करायची आहे.  ह्या लेसन 02 खाली Assignment कॉलम मध्ये असाईनमेंटची jpg फाईल उपलोड करा. (डेमो साठी इथे कोणतीही एखादी jpg फाईल अपलोड करा.) असाईनमेन्ट अपलोड केल्यावर पुढचा लेसन ओपन होईल. 

Step 18 : अशा पद्धतीने सर्व लेसन्स पूर्ण करून असाईनमेंट्स सबमिट केल्यावर परीक्षा पेज ओपन होईल. त्या पेजवरील Start Quiz / Start Exam बटनवर क्लिक करा.

Step 19 : प्रश्नपत्रिका ओपन होईल. सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे सिलेक्ट करा. 

Step 20 : सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर रिझल्ट पेज ओपन होईल. Click here to continue बटनवर क्लिक करा. 

Step 21 : आता तुम्हाला तुमच्या ग्रुप कोर्स पेजवर जायचे आहे. ग्रुप कोर्स पेजवर जाऊन Download Certificate बटनवर क्लिक करा. 

Step 22 : सर्टिफिकेट ओपन होईल. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. 

सर्टिफिकेटवर संस्थेचे नाव, सेंटरचे नाव, कोर्सचे नाव आणि कोर्स कधी पूर्ण केला ती तारीख असते. खाली संस्था प्रमुख आणि सेंटर ग्रुप लीडरची सही असते. 

सारांश : 
विद्यार्थ्याचा ग्रुप कोर्समध्ये प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्याने ऑनलाईन क्लासरूम मध्ये जाऊन पहिल्या लेसनपासून शिकायला सुरुवात करायची आहे. व्हिडीओ लेसन पाहून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करायचे आहे. संबंधित लेसनवर आधारित त्या लेसनखाली दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. आणि किमान एक असाईनमेंट सबमिट करायची आहे. असाईनमेंट सबमिट केल्यानंतर पुढचा लेसन ओपन होणार आहे. अशा पद्धतीने सर्व लेसन्स पूर्ण करून असाईनमेंट्स सबमिट केल्यावर परीक्षा असते. परीक्षेनंतर लगेच निकाल आणि त्याच वेळी तुम्ही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता. 

रिपोर्ट्स: 
– ह्या ग्रुप कोर्स कालावधीत ग्रुप लीडर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन कोर्स रिपोर्ट पाहू शकतो, विद्यार्थ्याने सबमिट केलेल्या असाईनमेंट तपासू शकतो. तसेच तो प्रोग्रेस रिपोर्ट, परीक्षा रिपोर्ट पाहू शकतो.
– गरज असेल तेंव्हा एक किंवा अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी ईमेल पाठवू शकतो.
– ग्रुप कोर्समधील एकूण सीट्स संपल्यानंतर नवीन सिट्सची ऑर्डर देण्यासाठी ग्रुप मॅनेजमेंट पेजवर Enrolled Users च्या खाली Total Seats च्या पुढील Add Seats बटनवर क्लिक करा. आणि ऑर्डर द्या. 
– ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी हे पाच कोर्स क्रमशः पूर्ण केले पाहिजेत. प्रत्येक कोर्स प्रॅक्टिकलसह पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिने लागतात. ग्राफिक डिझाईन मधील करिअर कोर्स मालिकेतील ‘कोरल ड्रॉ फॉर ग्राफिक डिझाईन’ हा पहिला कोर्स तुम्ही तुमच्या संस्थेत / सेंटरमध्ये सुरु करा. संस्थांसाठी 10, 25 आणि 50 कोर्स सीट्ससाठी पार्टनर बल्क डिस्काउंट उपलब्ध करून दिला आहे. तेंव्हा ग्राफिक डिझाईनच्या या ऑनलाईन ग्रुप कोर्स उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. 

ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे. 
मोबाईल : 7030005727 ई-मेल : hr@graphicart.in

 

2 thoughts on “तुमची स्वतःची ऑनलाईन ग्राफिक आर्ट इन्स्टिट्युट कशी सुरु कराल? <br> (Try Free Demo)”

    1. ऑनलाईन आम्हीच शिकवितो, आम्हीच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतो, तुम्हाला फक्त ऍडमिशन्स घ्यायची आहेत. ऑनलाईन शिकण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी Free Demo Course करून पहा. https://graphicart.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top