तुमच्या संस्थेत सुरु करा – ग्राफिक आर्टचे मराठी ऑनलाईन ग्रुप कोर्सेस.

 

चित्रकलेची आवड असणाऱ्या आणि जाहिरात, प्रिंटिंग तसेच वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे या संस्थेने ग्राफिक डिझाईनमधील ऑनलाईन ग्रुप कोर्सेसचा उपक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या आणि कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने हे पाच ऑनलाईन ग्रुप कोर्सेस अत्यंत उपयुक्त आहेत. 

 

कोर्स 01 : Corel Draw for Graphic Design 

 

कोर्स 02 : Photoshop for Graphic Design

 

कोर्स 03 : Pre-Press Design and Artwork

 

कोर्स 04 : WordPress : Website and Blogging

 

कोर्स 05 : Social Media Design for Branding

 

100 टक्के प्रॅक्टिकल असलेले हे पाच कोर्सेस आम्ही तुमच्या संस्थेसाठी क्रमशः ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. कारण ग्राफिक डिझाईनमधील हमखास करिअर साठी ज्या क्रमाने शिकले पाहिजे तोच अनुभवातून सिद्ध झालेला क्रम आम्ही निश्चित केला आहे. सर्वप्रथम ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना काय आहे आणि ग्राफिक डिझाईन ऑनलाईन शिकण्याची पद्धत काय आहे ते समजण्यासाठी चार लेसन्स, असाईनमेंट सबमिशन, एक्साम ते सर्टिफिकेटसह असलेला ऑनलाईन फ्री डेमो ग्रुप कोर्स देत आहोत, जेणेकरून ऑनलाईन ग्रुप कोर्स पद्धतीची तुमची ओळख होईल. ग्राफिक डिझाईनमधील करिअरचे महत्व आणि ही ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना तसेच ऑनलाईन शिकण्याची पद्धत समजून घेतल्यानंतर आमचा पहिला ऑनलाईन ग्रुप कोर्स तुम्ही तुमच्या संस्थेत सुरु करू शकता. 

 

ऑनलाईन ग्रुप कोर्स म्हणजे काय?

विद्यार्थी जसा वर्गामध्ये प्रत्यक्ष शिकतो, तसाच एक ग्रुप म्हणजे विशिष्ठ विषयाचा ऑनलाईन वर्ग. ऑनलाईन ग्रुप कोर्समध्ये सर्व विद्यार्थी एकाच वेळी किंवा ते दिवसभरात कोणत्याही वेळेत त्यांच्या सवडीनुसार शिकू शकतात. 

तुमच्या संस्थेत वरील पाच कोर्सेसचे प्रत्येकी एक या प्रमाणे स्वतंत्र पाच ग्रुप्स बनवायचे असतात. एका कोर्स ग्रुपमध्ये किती विद्यार्थी हवेत ते तुम्ही ठरवू शकता. तेवढ्या सीट्स  तुम्ही ऑर्डर करायच्या असतात.  प्रत्येक ग्रुपला तुम्ही तुम्हाला हवे ते नाव देऊ शकता. पण कोणत्या कोर्सचा ग्रुप आहे ते समजण्यासाठी ग्रुपच्या नावामध्ये संस्थेच्या संक्षिप्त नावासह कोर्सचे संक्षिप्त नाव असावे. उदा. Pragati College of Arts, Pune हे कॉलेजचे नाव असेल तर तुमच्या ग्रुप कोर्सची नावे Pragati Pune : Corel Draw, Pragati Pune : Photoshop अशी असू शकतात. प्रत्येक विषयाच्या ग्रुपसाठी तुमच्या संस्थेतीलच एक ग्रुप लीडर नेमायचा आहे. ग्रुप लीडर हा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थीही असू शकतो. ग्रुप कोर्सची ऑनलाईन संपूर्ण मॅनेजमेंट ग्रुप लीडरच्या हातात असते. किंबहुना ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांवर ग्रुप लीडरचा कंट्रोल असतो. सर्व विषयांच्या ग्रुप्सचा एकच ग्रुप लीडर असतो किंवा प्रत्येक विषयाच्या ग्रुपसाठी तुम्ही स्वतंत्र ग्रुप लीडर नेमू शकता. ग्रुप लीडर त्याच्या कंट्रोल पॅनेलमधून ग्रुप कोर्स हॅण्डल करतो. त्यामध्ये खालील गोष्टी येतात. 

 

1. विद्यार्थ्याला ग्रुप कोर्समध्ये प्रवेश देणे.

2. कोर्स फी मिळाल्याची खात्री करून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला संबंधित कोर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी Enrollment Key पाठविणे. 

3. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मिळालेल्या त्या त्या लेसनच्या असाईनमेंट्स चेक करून Approve करणे. कारण असाईनमेंट approve झाल्याशिवाय पुढचा लेसन ओपन होत नाही. 

4. कोर्स सीट्स संपल्यानंतर नवीन सीट्ससाठी ऑर्डर देणे.

5. कोर्स रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट, असाईनमेंट्स रिपोर्ट, एक्झाम रिपोर्ट पाहणे, 

6. नवीन ग्रुप लीडर ऍड करणे.

7. गरजेनुसार एक किंवा अनेक विद्यार्थ्यांना ईमेल पाठवणे.

 

कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ह्या कोर्सेसचा उपयोग नक्कीच होतो. किंबहुना ग्राफिक डिझाईनमध्ये विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवू शकतो. प्रत्येक लेसनमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल करून त्या लेसनवर आधारित दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. असाईनमेंट्स सबमिट केल्यानंतरच पुढचा लेसन ओपन होणार आहे. ज्या त्या लेसनची असाईनमेंट त्या त्या दिवशीच पूर्ण करायची असल्याने विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास होतो. 30 लेसनचा कोर्स किमान दोन महिन्यात पूर्ण करायचा आहे. सर्व लेसन्स पूर्ण करून असाईनमेंट्स सबमिट केल्यानंतर एक्झाम पेज ओपन होईल. 100 मार्कांची परीक्षा दिल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांला निकाल मिळतो, आणि ज्या संस्थेच्या ज्या कोर्स ग्रुपमध्ये विद्यार्थी असेल त्या संस्थेच्या त्या कोर्स ग्रुपच्या नावाने सर्टिफिकेट मिळते.  विद्यार्थ्याला प्रवेश घेतल्यापासून 100 दिवस कोर्स ऑनलाईन उपलब्ध असतो. या कालावधीत तुम्ही तुमच्या ग्रुप पेजवर जाऊन कधीही सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता.  

 

तुमच्या संस्थेत ग्राफिक आर्टचे मराठी ऑनलाईन ग्रुप कोर्सेस सुरु करण्यापूर्वी ऑनलाईन फ्री डेमो कोर्स ग्रुप तयार करून, ही अद्ययावत ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम प्रत्यक्ष पाहू शकता. यामध्ये विद्यार्थ्याच्या कोर्स प्रवेशापासून असाईनमेंट सबमिशन, परीक्षा ते फायनल सर्टिफिकेट मिळेपर्यंत सर्व गोष्टी आहेत.  तुम्ही ह्या फ्री डेमो ग्रुप कोर्सचा डेमो पाहून ऑनलाईन ग्रुप कोर्स संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. काही शंका आल्या तर विचारू शकता. 

 

 

 

Scroll to Top